राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा विभागात निषेध
रावेरसह मुक्ताईनगर व बोदवडला प्रशासनाला निवेदन : मास्टर माईंडचा शोध घेवून कारवाईची मागणी
भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भुसावळ विभागातील राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. हल्ला करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यासह हल्ला प्रकरणातील मास्टर माईंडचा शोध घेवून कारवाईची मागणीही शनिवारी ठिकठिकाणी करण्यात आली व भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला.
रावेर पोलिस निरीक्षकांना निवेदन
रावेर : पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, राजू ठेकेदार, आर.डी.वाणी, सचिन पाटील, सोपान पाटील, गयासुद्दीन काझी आदी यावेळी उपस्थित होते.
मुक्ताईनगरात हल्ल्याचा निषेध
मुक्ताईनगर : मुक्ताईनगरात हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तहसीलदार व मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रंजना कांडेलकर, सरचिटणीस रवींद्र दांडगे, कल्याण पाटील, माजी सभापती राजु माळी, दशरथ कांडेलकर, नगरसेवक मस्तान कुरेशी, बापू ससाणे, प्रवीण पाटील, एजाज खान, आसीफ बागवान, शेषराव पाटील, भाऊराव पाटील, नामदेव राठोड, शांताराम इंगळे, विजय पाटील, अंजना बेलदार, शशीकला कांडेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
बोदवडमध्ये हल्ल्यामागील राजकीय शक्तींचा शोध घेण्याची मागणी
बोदवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या बंगल्यावर भ्याड हल्ला करणार्या हल्लेखोरांमागे कोणती राजकीय शक्ती आहे याचा तत्काळ शोध घेवून त्यातील मुख्य सूत्रधाराला गजाआड करावे व हल्लेखोरांना कठोर शासन करावे, अशी मागणी बोदवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांसह पदाधिकार्यांनी बोदवड पोलिस निरीक्षकांना निवेदन देवून केली. यावेळी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जिल्हा दुध संघ संचालक मधुकर राणे, तालुका कार्याध्यक्ष निलेश पाटील, शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, माजी सभापती किशोर गायकवाड, माजी नगरसेवक कैलास चौधरी, नगरसेवक भरत पाटील, दीपक झांबड, हकीम बागवान, शे.लतीफभाई, मुज्जम्मील शहा, किशोर पाटील, विनोद पालवे, कडू माळी, कल्पेश शर्मा, किरण वंजारी, रवींद्र खेवलकर, दीपक वाणी, नईम बागवान, निलेश माळी, शालिग्राम काजळे, विलास देवकर, संजय वराडे, वामनराव ताठे, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील, प्रमोद धामोळे, भागवत टिकारे, जीवन राणे, दिलीप पोळ, विनोद कोळी, आनंदा पाटील, अमृत पटेल, प्रफुल्ल लढे, नितीन चव्हाण व महिला आघाडी तालुकाध्यक्षा वंदना पाटील, नगरसेविका योगीता खेवलकर, शहराध्यक्षा प्रतिभा खोसे, शहर उपाध्यक्षा कविता गायकवाड व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.