तळेगाव दाभाडे : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडीयाच्या अध्यक्षपदी खुर्द येथील युवा कार्यकर्ते संजय एकनाथ शेडगे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, मावळ केसरी पै विकास वाघोले, मावळ तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष कैलास गायकवाड आदी उपस्थित होते. शेडगे हे राष्ट्रवादीचे क्रियाशील कार्यकर्ते असून ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडीयाचे सरचिटणीस आहेत. आगामी काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्ष्याच्या ध्येयधोरणाची जनजागृती करुन पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार असल्याचे शेडगे यांनी सांगितले.