अमळनेरात डॉ.श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
फिनिक्स गृपतर्फे आयोजीत व्याख्यानात मिळाली वैचारीक मेजवानी
अमळनेर । महाराष्ट्रात ब्राम्हण व मराठ्यांचा वाद अनेक कालखंडापासून सुरू आहे ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर यांच्या जातीवादामुळे महाराष्ट्र होरपळतोय ही बाधा समाजकरनाला आणि राजकारणाला झाली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात फिनिक्स सोशल अवेरनेस गृपतर्फे आयोजित समाज प्रबोधन आणि राष्ट्रउभारणी या विषयावर बोलताना केले.कार्यक्रमाचे उद्घाटन गृपच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर भगतसिंग व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला मेणबत्त्या पेटवून ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ ह्या गीतावर समाज प्रबोधन व राष्ट्रउभारणीचा संकल्प करण्यात आला. प्रताप कॉलेजच्या पहिल्या महिला प्राचार्य ज्योती राणे यांचा सत्कारही करण्यात आला.तसेच प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत पुरस्कार मिळवणार्या अमळनेर, ढेकु, जानवे, मारवड, मांडळ, पातोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रा.श्याम पाटील, पराग पाटील, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, डॉ.अविनाश जोशी, रमेश पवार, विजय पाटील, धनदाई संस्थेचे संचालक डी.डी.पाटील, व.ता.पाटील, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, अॅड.रज्जाक शेख, पी.व्ही.पाटील, डॉ.सुनंदा गुजराथी, विद्या हजारे, अनिता सूर्यवंशी, नीता शिरसाळे, अॅड. साधना वैद्य, प्राचार्य प्रकाश महाजन, प्राचार्य रवींद्र माळी, एस.डी.देशमुख, प्रा.विश्वनाथ ठाकरे, गोकुळ बोरसे, हर्षल जाधव उपस्थित होते. सुत्रसंचालन वसुंधरा लांडगे तर आभार अमोल माळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी फिनिक्स गृप व जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.