राष्ट्रीय अजैविक स्टे्रस प्रबंधनचे स्वच्छता अभियान कागदोपत्री; कर्मचार्‍यांची पार्टी

0

बारामती । बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राष्ट्रीय अजैविक स्टे्रस प्रबंधन संस्था आहे. सध्या ही संस्था कृषी संशोधनाऐवजी भलत्याच कारणासाठी गाजत आहे. या संस्थेने केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम आयोजित न करताच केवळ कागदोपत्री स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबविला. यात श्रम परिहार करण्यासाठी जंगी मटणपार्टी केली गेली. यासाठी संस्थेच्याच बोकडांचा बळी देण्यात आला, असे सूत्रांकडून समजते.

भारत सरकारच्या कृषी संशोधन परिषदेच्यावतीने बारामती तालुक्यातील माळेगाव खूर्द येथे राष्ट्रीय अजैविक स्टे्रस प्रबंधन संस्था उभारण्यात आली आहे. या संस्था भारतात फक्त माळेगाव येथेच आहे. संस्थेचा परिसर हा जवळपास 400 एकरचा असून कृषी विषयक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन येथे केले जाते. सध्या मात्र निधीअभावी बरीच कामे ठप्प आहेत, असे सांगितले जात आहे. येथे निदेशक (डायरेक्टट) असून जवळपास 30 अधिकारी व 150 कर्मचारी कार्यरत आहेत.

कडक कारवाईची मागणी
या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी श्रम परिहार म्हणून जंगी पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी संस्थेच्या गोट फार्ममधील बोकडांचा बळी देण्यात आला. पुण्याच्या मारुती केटरर्सचे बनावट बिल सादर करून सरकारी पैशाची उधळपट्टी करण्याचा आरोप केला जात आहे. बाबुलकुमार सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली या पार्टीचे आयोजन केले गेले. याबाबत केंद्रसकरकारकडे पाठपुरावा केला जाणार असून कडक कायदेशीनर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.