राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे क्रांतीदिनी लक्षवेधी मोर्चा

0

जळगाव। राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या मागण्याबाबत पावसाळी विराट मोर्चाचे आयोजन करणेबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना देण्यात आले. महासंघातर्फे यापूर्वी अंपगाच्या मागण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदन सादर केलेली असून सदर महासंघाच्या मागण्या अद्याप शासनाने मान्य केलेले नाहीत व त्यामुळे राज्यातील तीस लक्ष अपंग बांधवांचे पुर्न:वसन अद्याप रेगांळलेले ओत. अपंगाच्या प्रमुख मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत महासंघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करावी अन्यथा महासंघाच्या वतीने दि. 9 ऑगस्ट रोजी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर अपंगांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा महासंघाने दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
केंद्राप्रमाणेत राज्यात अपंग विकास विभाग स्वतंत्र करण्यात यावा, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ सामाजिक न्याय विभागातून वेगळे करुन वित्त व नियोजन विभागाकडे सुपूर्त करावे. व्यवस्थापकीय संचालक पदावर अधिकार्‍यांची नियुक्ती करावी. अंपग बांधवांनी घेतलेल्या कर्जाची कर्जमाफी करावी. निराधार योजनेचे पेन्शन रु. 2000/- व उत्पन्न मर्यादा रु. 1,00,000/- करावी, अपंगासाठीचा राखीव 3 टक्के निधी जिल्हा परिषद महानगरपालिका ग्रामंपचायत यांनी पूर्णपणे खर्च करावा, अपंग आयोग स्थापन करावा, जिल्हा अपंग समन्वयक समिती यांचे पुर्नगठन करुन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ प्रतिनिधींच्या समावेश करावा, याबाबत जिल्हाध्यक्ष अशपाक भाई भागवान, आशा बाविस्कर, भरत जाधव, शकील शेख, हरिराम तायडे, निलेश बोरा, सै. अकील पहेलवान, गोकुळ अहिरे, कैलास जोशी, निलेश शेकोकार यांनी निवेदन दिले.