जळगाव । राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाने श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जळगावात राज्यस्तरीय वधू-वरमेळाव्याचे आयोजन रविवार 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा सरदार वल्लभभाई पटेल हॉल, बी.एस.एन.एल.ऑफिसजवळ होणार असून त्यासाठी समाजातील 300 विवाहेच्छुकांनी नावनोंदणी केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी पत्र परिषदेत दिली.
रविवारी सरदार पटेल भवनात आयोजन
मेळाव्याप्रसंगी कोळी समाजाचे अध्यक्ष रमेश पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.सुरेश भोळे, मा.आ.सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे, युवा कोळी समाजाचे अध्यक्ष चेतन पाटील, राखी सोनवणे, सरस्वती सोनवणे, कोळी समाजाच्या महिलाध्यक्ष सुमन सोनवणे तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याचेही मुकेश सोनवणे यांनी सांगितले. या पत्रपरिषदेत नामदेव सोनवणे, भगवान सपकाळे, संदीप कोळी, सुभाष सोनवणे, राजू सोनवणे, भैय्या सोनवणे, दीपक सोनवणे, मनोज सपकाळे, कडू कोळी, खेमचंद सपकाळे, विशाल सपकाळे, किरण सोनवणे, प्रमोद बाविस्कर, गोपाल सपकाळे, निलेश तायडे आणि चंद्रकांत सपकाळे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी महाराष्ट्र,गुजरात, आणि मध्यप्रदेशातून समाजातील कार्यकर्ते येणार आहेत.
30 जिल्ह्यातून येणार तरुण
30 जिल्ह्यातून समाजातील वधू – वरआणि त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत. यामधून मुला-मुलींना योग्य जोडीदाराची निवड करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून वधू – वर पुस्तिकेचे कामकाज सुरु आहे. विवाहेच्छुकांनीआपली संपूर्ण माहिती भरून शिवम बिल्डर्स, 60 खान्देश मिल शॉपिंग कॉम्प्लेक्स जळगाव येथे नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी मुकेश सोनवणे 9422277737 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.