राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजेंद्रसिंह वालिया यांची निवड

0

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया यांची भारतीय मानवाधिकार परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख यांनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात वालिया यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष चरणजीतसिंह उपस्थित होते. वालिया हे पंजाबी कला केंद्र, पुणेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच पिंपरी -चिंचवड हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.