राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा संकल्प करु या!

0

जळगाव । शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, राजकीय पक्ष कार्यालय आदी ठिकाणी 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर , महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आदी उपस्थित होते.

देशभक्तीपर गितांची धुन
या कार्यक्रमात ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून परेडची पाहणी केली. परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी भापोसे अधिकारी मनिष कलानिया यांनी केले . यावेळी झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय, महिला पुरुष पथके, होमगार्ड महिला पुरुष पथके, एन.सी.सी विद्यार्थी -विद्यार्थिनींचे पथक, आर.एस.पी पथके, स्काऊट – गाईड पथक, राष्ट्रीय सेवा योजना आदी पथकांनी सहभाग घेतला व शानदार संचलन केले. तसेच पोलीस दलाचे श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, वरुण रथ, अग्निशामक पथक, तसेच स्वच्छता रथांनी सहभाग घेतला. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या देशभक्तीपर गितांच्या धुनवर झालेल्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण संचलनाने वातावरण भारावले होते. वरुण रथ, स्वच्छता रथ यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनात सहभाग घेतला.

सास्कृतिक कार्यक्रमांमुळे रंगत: परेड निरिक्षणानंतर ना.खोत यांच्या हस्ते सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या तर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय यांनी योग पिरॅमिड, नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाचे लेझीम नृत्य, पोलीस बॉईजचे कराटे प्रात्यक्षिके, प. न. लुंकड कन्या शाळेच्या विद्यार्थिनींचे देशभक्तीपर गितावरील नृत्य, शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय यांचे सर्वधर्म समभाव या विषयावरील मूक नाट्य, शानबाग विद्यालयाचे बॅण्ड पथक , ए.टी. झांबरे विद्यालयाचे वंदे मातरम आदी बहारदार गीत व नृत्याचा समावेश होता.

मान्यवरांची उपस्थिती : या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर , महापौर नितीन लढ्ढा, तसेच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी उपस्थित होते.
या सोहळ्याचे सुत्रसंचालन अनिल पाटील, उषा शर्मा, जी. एम. उस्मानी यांनी केले.

अपंग बांधवांना भोजन : लक्ष्मीनगर येथील श्री समर्थ कृपा अपंग महिला बचत गटातर्फे प्रजासत्ताकदिनानिमित्त अपंग बांधवाना भोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच अध्यक्ष गणेश पाटील होते. याप्रसंगी श्री समर्थ कृपा अपंग महिला बचत गटाच्या अधक्षा संगीता प्रजापती, मनिषा दळवी, मालती सुर्यवंशी, आशा पाटील, शकील शेख, राजेश बाविस्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर नेवे यांनी तर आभार हरिराम तायडे यांनी मानले.

इकरा शाहीन प्राथमिक शाळाः मेहरूण येथील इकरा शाहीन उर्दू प्राथमिक शाळेत चेअरमन डॉ. ताहेर शेख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते सादर केलीत. विविध स्पर्धेंतील विजेत्यांना यावेळी पारीतोषिक वितरण करण्यात आले. यात प्रथम गटात इयत्ता 3रीच्या हस्ताक्षर स्पर्धेंत शेच रजान मंजुर अकेमद सबा अंजुम शेख जावेद तर शुमायला शेख शकील तर गटात इयत्ता 4च्या अरबीना अशफाक अंसारी, मलीका सॉलेह नाझीम,अदनान साबीर पिंजारीने . तसेच लॅग्वेज क्विझ स्पर्धेंच्या प्रथम गटात इयत्ता 3रीचा सुलेम शेख अ. अलीम प्रथम, निस्मा खानम मो. असलम नाझीम द्वितीय तर पटेल हपसा अमीर पाशा तृतीय तर द्वितीय गटात चौथीतील निदा भिकन पटेल प्रथम, उम्मे हानी अताउल्ला खान द्वितीय, अयान रहीम बागगान तृतीय स्थानी राहिला. विजेत्यांना अध्यक्ष अ. करीम सालार, चेअरमन डॉ. ताहेर शेख, प्राचार्य डॉ. शुजाअत, गुलाब सर, जुबेर सर, काझी सर यांच्या हस्ते देण्यात आले.

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये धनलाल चंपालाल शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांनी वेशभूषा करुन त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. संजय महाजन सरासोबत विद्यार्थ्यांनी हमको अपने भारत के मिट्टी से अनुपम प्यार है। हे गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षणाचे प्रात्याक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक सुनील पाटील, मुख्याध्यापिका वैशाली मोरे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

इकरा शाहीन उर्दु हायस्कूल
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये शाळेचे चेअरमन डॉ. ताहेर शेख यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अ.करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व चांगले नागरीक बनयाचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इफतेखार गुलाम यांनी तर आभार खान अतिक यांनी मानले. याप्रसंगी इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्यु कॉलेजचे डॉ. मो. ताहेर थीम महाविद्यालयाचे प्राचार्य शुजाअत अली, इकरा शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख गुलाब इस्हाक प्राथमिकचे मुख्याध्यापक काझी अख्तरोद्दीन आय.टी.आय. चे प्रचार्य जुबेर मलीक उपस्थित होते.

रेडक्रॉस येथे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याहस्ते ध्वजारोहण!
68 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगावच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजा रोहणानंतर श्रीमती रूबल अग्रवाल यांना बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाकरीता देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला व त्याचा सन्मानार्थ रेडक्रॉस तर्फे बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्पनेचे स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी रेडक्रॉसचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

चित्तथराराक प्रात्याक्षिकांचे करण्यात आले प्रदर्शन
प्राजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतांना नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाचे लेझीम नृत्य पथक. तसेच पोलीस बॉईज यांनी चित्तथरारक प्रत्याक्षिके सादर केली. दरम्यान प. न. लुंकड कन्या शाळेच्या विद्यार्थिनींचे देशभक्तीपर गितावरील नृत्य सादर करुन उपस्थितांमध्ये देशभक्तीपर भावना वृध्दीगंत केली. श्‍वास रोखून धरणार्‍या चित्तथरारक प्रात्यक्षिके बघून उपस्थितांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

यमुना फौडेशन जळगाव
प्रजासत्ताक दिन विविध समाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन नेवे, ज्येष्ठ समाजसेवक यांच्याहस्ते महापुरुष घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिचित्रास संविधनाला मार्ल्यापण करण्यात आले. प्रमुख अतिथी डॉ. हेमलता रोकडे, ज्येष्ठ समाजसेविका रजनी नवे, जगदिश नेवे, गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर नेवे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. फौंडेशनच्या प्रांगणात 10 वृक्षरोपन संवर्धन संरक्षण यांच्या जबाबदारी संस्थेच्या सदस्यांनी घेतली. सूत्रसंचालन राजेश नेवे, आभार प्रदॉन किशोर नेवे, राजेश, पाटील, भटू जोशी, दत्तूभाऊ भदाणे, प्रकाश सोनगिरे, निलेश शिंपी, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

भारत विकास परिषद
भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे आकाशवाणी चौकात भारतमाता पूजन आणि देशभक्तिपर गीत गायन कार्यक्रम झाला. आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुभाई पटेल, महापौर नितीन लढ्ढा, पुखराज पगारिया, विनय पारेख, किशोर ढाके, सुनील भंगाळे, संजय बिर्ला,शामभाऊ मुंदडा, प्रा. राजेंद्र देशमुख, चंदू नेवे यावेळी उपस्थित होते.मान्यवरांनी भारतमाता प्रतिमेचे पूजन केले. नागरिकांमधून पवन झवर, स्मितल बिर्ला, मनोज राठोड यांनी प्रतिमा पूजन केले. प्रकल्प प्रमुख चेतन दहाड, भारत विकास परिषदेचे शाखाध्यक्ष तुषार तोतला, राजू कोचर, नंदुजी जयस्वाल, राजीव नारखेडे यांनी स्वागत केले. देशभक्तिपर गीत गायन आशा पाटील, आर. डी. पाटील, कपील घुगे, श्रृती वैद्य व मोहन तायडे यांनी केले. त्यांना ऑर्गनवर शिवम चक्रवर्ती, ऑक्टोपॅडवर नितीन पाटील यांनी साथ दिली.

राष्ट्रवादी काँग्रस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात कार्याध्यक्ष विलासभाऊसाहेब, जिल्हा समन्वयक विकास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. ध्वजस्तंभाचे पूजन मंगला पाटील यांच्या हस्ते होवून ध्वजारोहन महिला राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक व सूत्रसंचालन सेवादलाचे वाय. एस. महाजन यांनी केले. याप्रसंगी विकास पवार, अयाज अली, प्रा. एन.डी. पाटील, प्रा. डी. एस. पाटील, ज्ञानेश मोरे, अ‍ॅड. राजेश गोयर, काशिनाथ इंगळे, बी. डी. चिरमाडे, डॉ. दिपक पाटील, अ‍ॅड. कुणला पवार, चेतन सनकत, जयप्रकाश चांगरे, रोहन सोनवणे, पराग पवार, संजय चव्हाण, बंडू भोळे, अ‍ॅड. सचिन पाटील, जयप्रकाश महाडिक, अ‍ॅड. एस. एस. पाटील, डी. आर. शिंपी, सिताराम धनगर, बाळु तांबे, विरेंद्र पाटील, नंदू पाटील, शांताराम पाटील, उज्वल पाटील, संदिप पवार, गणेश निंबाळकर, राजू बाविस्कर, सविता बारेसे, निला चौधरी, माधुरी पाटील, मिनल पाटील, लता मोरे, ममता तडवी, मनिषा देशमुख, अर्चना कदम, शोभा भोईटे आदी उपस्थित होते.

जळगाव परिमंडळ महावितरण
महावितरणच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता बी.के.जनवीर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्याने गुणवंत कामगार व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त गुलाबराव सोनवणे, राजेंद्र महाजन या दोन कामगारांना गौरविण्यात आले. विनाअपघात सुरक्षित वाहन चालविण्याचे दिर्घसेवेबद्दल वाहनचालक नंदकिशोर चोपडे, शरद माले, प्रकाश मालिच यांना तर रविंद्र भामरे यांना धनादेश देउन सन्मानित करण्यात आले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कु.हिमाली पाटील व चि.दिग्वजिय चात्रे यांना शिष्यवृत्तीचा धनादेश देउन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

भंगाळे माध्यमिक विद्यालय
सिताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालयात व अप्पासाहेब जे. एस. शिंदे प्राथमिक विद्यामंदीरात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विष्णु भंगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सुहास बोरोले, पिंताबंर इंगळे, रामदार अत्तरदे, मधुकर धांडे, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. यानंतर खोटे नगर परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. सूत्रसंचालन विजया चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी माध्यमिक मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, दिपक भारंबे, विवेक नेहते, दिपनंदा पाटील, अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे, सचिन महाजन, निखिल नेहेते, सारिका सरोदे, अश्‍विनी वाघ, दिपाली पाटील, उत्कर्षा सोनवणे, अनिता चित्ते यांनी सहकार्य केले.