राष्ट्रीय एकात्मतेसाठी खेळ महत्वाचा; खेळातून देशाचे नाव मोठे करा

0

शिरपूर । आपल्या जीवनात संघभावना महत्वाची असते. खेळाच्या माध्यमातून एकता वाढते. व राष्ट्रीय एकात्मतेसाठी खेळ महत्वाचे असून येथे आलेल्या खेळाडूंमधील उत्साह कौतुकास्पद आहे. यातुन संस्थेचे व देशाचे नाव मोठे करा असे प्रतिपादन शिरपुरचे प्रांताधिकारी नितीन गावंडे यांनी केले. शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित व्यंकटेश कला व क्रीडा महोत्सव 2018 च्या समारोप प्रसंगी बोलत होते. प्रास्ताविकात व्यंकटेश क्रीडा मंडळाचे सचिव रोहीत रंधे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व असाच उत्साह कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंतांना बक्षिस दिले. शिरपूर येथील रंधे क्रीडा मैदानावर महोत्सवाचा पारितोषिक वितरण पार पडला.

यांची होती उपस्थिती
या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे होते तर बक्षिस वितरण समारंभ शिरपूरचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी नितीन गावंडे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, शिरपूरचे तहसीलदार महेश शेलार, संस्थेच्या कोषाध्यक्षा आशाताई रंधे, विश्‍वस्त लीलाताई रंधे, सचिव निशांत रंधे, शिरपूर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, विश्‍वस्त आर.एफ.पाडवी, शामकांत पाटील, डॉ.जितेंद्र चित्ते, आनंदसिंग राऊळ, शिरपूर व्यंकटेश क्रीडा मंडळाचे सचिव रोहित रंधे, शशांक रंधे, डॉ.सुमिता गवळी, जि.प.सदस्या सिमा रंधे, सारीका रंधे,विद्या रंधे, हर्षाली रंधे, राजेंद्र अग्रवाल, संजय गुजर, प्राचार्य डॉ. एस.एन.पटेल, बी.डी.पाटील, टी.टी.बडगुजर, दिपक रंधे, उपस्थित होते.

यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
गेल्या तीन दिवसांत खेळाडूंनी अनेक अनेक खेळात उत्कृष्ट प्रदर्शन केले. विजेत्यांना सुवर्ण, रजत, कास्य पदक व चषक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जवळपास 1800 खेळाडूंनी भाग घेतला.यावेळी स्पंदनगृपच्या वतीने खुल्या शॉटी व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम आय.सी.एस.गृप मालेगाव, द्वितीय जामनेर युनुस गृप, तृतीय जामनेर शोएब गृप, चतुर्थ आझाद गृप निकाल लागला. यात एकुण 35 संघ सहभागी झाले होते. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, सर्व शाखांचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील, के.डी.बच्छाव, बी.आर.माळी, सिताराम माळी, नरेंद्र कापडे, प्रल्हाद सोनार परिश्रम घेतले.

स्पर्धेतील सर्वसाधारण विजेते पद
सिनियर गट मुले – एस.पी.एम.महाविद्यालय, शिरपूर
सिनियर गट मुली- एस.पी.डी.एम.महाविद्यालय, शिरपूर
ज्यु. कॉलेज गट मुले – डॉ. घोगरे ज्युनिअर कॉलेज, शिरपूर
ज्यु. कॉलेज गट मुली – डॉ.घोगरे ज्युनिअर कॉलेज, शिरपूर
माध्य. गट मुले – महात्मा ज्योतिबा फुले माध्य.विद्या. शिरपूर
माध्य. गट मुली- कर्मवीर व्यं. ता.रणधीर माध्य.विद्या. वाडी