विज्ञान विषयात देशातून अव्वल
निगडी : येथील आकुर्डी-चिंचवड एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू पुणे पब्लिक स्कूल (सीबीएसई)च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरीय ऑल्म्पियाड परीक्षेत 7 सुवर्णपदके व 10 रजतपदके मिळवून अव्वल स्थान पटकावले. ओम गोचडे या सहावीच्या विद्यार्थ्याने विज्ञान विषयात देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यास सुवर्णपदक व लॅपटॉप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मानित केले.
बंगळूरू येथील नॅशनल टीचर्स कौन्सिलच्यावतीने 2017 साली गणित, विज्ञान, इंग्रजी, ऑल इंडिया टॅलेंट सर्च या चार विषयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत न्यू पुणे शाळेतून सहभागी झालेल्या 7 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आकुर्डी- चिंचवड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खंदारे, सचिव प्रदीप खंदारे, मुख्याध्यापक लतीफ मणेर यांनी अभिनंदन केले.
सविस्तर निकाल – विज्ञान विषयात सुवर्णपदक विजेते पुढीलप्रमाणे ओम गोचडे (प्रथम), ध्रूव सुरवसे (द्वितीय), मोहम्मद इब्राहिम खान (तृतीय), तर गणित विषयात सुशील सातपुते, आयुष साहू, वेदांत शिरसाट. तर रजत पदक विजेते – ओम भेंडे, अदिती कापसे, प्रणिती मल्ल्या, हर्षल कणकेरा. विज्ञान विषयात टिया चौधरी, वरुण मुळे, अराफात शेख, ओम गोचडे यांनी इंग्रजी विषयात यश संपादन केले. तर टॅलेंट सर्चमध्ये दर्शिता सुरवसे हिला तर ध्रूव सुरवसे याला गणितात रजत पदक मिळाले.