राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे अधिवेशन दिल्लीत

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि खासदार नाना पटोले यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. या अधिवेशनात ओबीसींच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले गेले.

यावेळी खा. पटोले म्हणाले की, एससी, एसटी प्रमाणेच ओबीसींवरही अत्याचार केला जातो. त्यामुळे ओबीसी समाजाला अॅट्रोसिटी कायद्यात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ओबीसीची जनगणना जाहीर करावी तसेच ओबीसी समाजासाठी केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी पटोले यांनी केली. तायवाडे यांनी सांगितले की, २७ टक्के पैकी १२ टक्केच जागा भरल्या जात आहेत. – नाॅन क्रिमिलेअर मुळे जागा भरल्या जात नाहीत यामुळे नाॅन क्रिमिलेअर काढून टाकावे अशी मागणी देखील त्यांनी केली. ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळावे या सर्व मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले.