नेरुळ : ३ री राष्ट्रीय कॅडेट कोरियुगी व पुमसे तायक्वांडो (कराटे) चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धा २१ ते २३ जुलै २०१७ रोजी भुवनेश्वर- ओरिसा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील पृथ्वीराज थोरबोले, आर्यन कुलकर्णी, शिवम भोसले यांच्या संघाने सुवर्णपदक पटकाविले तर वसुंधरा चेडे हिने पेयर प्रकारात सुवर्णपदक मृणाली हाराणीकर हिने वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेत रॉबिन सर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत देशातील २४ राज्यातील ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.अटीतटीच्या सामन्यात या स्पर्धकांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले असून त्यामुळे नवी मुंबईमध्ये या खेळाडूंचे कौतुक होत आहे.