पोलादपूर । तालुक्यातील दाभिळ गावातील दारिद्रयरेषेखालील गरीब व्यक्ती आनंद पवार याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल दळवी यांच्या पाठपुराव्यामुळे सदर मृत व्यक्तीच्या विधवा पत्नीला राष्ट्रीय कुटूंब अर्थसाह्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल हनुमंत दळवी यांनी तातडीने पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये राष्ट्रीय कुटूंब अर्थसाह्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी तिचा प्रस्ताव तयार करून सादर केला. या प्रस्तावाची पडताळणी होऊन निकषांनुसार श्रीमती छाया आनंद पवार यांना वीस हजार रूपयांच्या अर्थसाह्याचा धनादेश नायब तहसिलदार गणेश आढारी यांच्याहस्ते कार्यकर्ते अनिल दळवी आणि तलाठी म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.