राष्ट्रीय क्रीडा दिनानमित्त क्रिडा परिषदेचे आयोजन

0

पुणे । हॉकीपटु मेजर धयानसिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रिडा दिन (29 ऑगस्ट) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त क्रीडा परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष तथा परिषदेचे समन्वयक योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्वे रस्त्यावरील बालशिक्षण मंदीराच्या सभागृहात ही परिषद होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीष बीपट उपस्थित राहणार आहेत.

शहरातील क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक क्रीडा वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते आजी माजी खेळाडू, पंच परिषदेला हजेरी लावणार आहेत. ही क्रीडा परिषद चार सत्रात होणार असून क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.

शहराच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची गरज व त्यासंदर्भात अंमलबजावणी संदर्भात चर्चा तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने संकल्प मांडण्यात येणार आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शशिकांत भागवत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र हेणार आहे. तर महाराष्ट्र मिशन वन मिलीयन- एक फुटबॉल चळवळ या विषयावर आशिष पंडसे ध्वनीचित्र फितीद्वारे संवाद साधणार आहेत. तर क्रीडा परिषदेचे फलित या विषयावर योगेश गोगावले संवाद साधणार आहेत. आभार प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पंच वसंत गोखले करतील.

क्रीडा संकल्पासाठी परिषदेचे आयोजन
पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात काँग्रेसचे निलंबीत नेते सुरेश कलमाडी यांनी देखील योगदान दिले आहे. त्यांना या परिषदेसाठी निमंत्रीत करणार काय असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, योगेश गोगावले यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. ही परिषद पुण्याच्या क्रीडा संकल्पासाठी असून कोणताही राजकीय बडेजाव मिरविण्यासाठी नाही. जर राजकीय स्वरुप द्यायचे असते तर केंद्रातील कोणताही मंत्री परिषदेला बोलविला असता, असे गोगावले यांनी सांगितले.