नवी मुंबई । 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन नेरुळ येथील शिक्षण प्रसारक विद्यालयात साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून एक गणित भिंत व प्रश्न पेटीचे उद्घाटन करण्यात आले. याचा फायदा शाळेतील विध्यार्थ्यांना चांगलाच होणार असल्याचे मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर यांनी सांगितले. शेखर जगताप यांच्या संकल्पनेतून एक भिंत गणित भिंत व प्रश्न पेटीची संकल्पना तयार झाली. गणित भिंतीवर थोर गणित तज्ज्ञ श्री निवासन, अरयाभट्ट, भास्कराचार्य, पायथागोरस, अपोलोनियास, टोलेमीवेंन, थेलस यांच्या कार्याचा परिचय करून देणार्या गणित व भूमितीमधील विविध गणित, प्रेमय, आकृत्या, समीकरणे, पृष्ठफळ, वर्गमूळ विषयावरील कागदी पोस्टर विद्यार्थ्यानी तयार करून प्रदर्शित करण्यात आले आहे.
याच प्रदर्शनात एक प्रश्न पेटीही लावण्यात आली आहे. या प्रश्न पेटीत ज्या विद्यार्थ्यांना अडचणीची व कठीण असणारी गणित व भूमितीचे प्रश्न टाकून संबंधित शिक्षक शंका निरसन करणार असल्याचे शिक्षक शेखर जगताप यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना गणिताची माहिती मिळवून देण्यासाठी पूर्वा ठाकरे व राजेंद्र पिंगळे या शिक्षकांनी सहकार्य केले तर प्रदीप खिस्ते यांनी गणिततज्ज्ञ श्री निवास रामनुजम यांच्या जीवनाचा परिचय उलगडून सांगितला. साहिल गायकवाड, संदीप गवारी, संकेत म्हात्रे, सुरज आणेकर, विनीत तेलंगे, दक्षता मेहेर या विद्यार्थ्यानी भिंत सजावटीसाठी विशेष मेहनत घेतली.