राष्ट्रीय गणित परिषदेसाठी रविकिरण पाटील यांची निवड

0

चाळीसगाव । शहरातील डॉ.काकासाहेब पुर्णपात्रे विद्यालयातील उपशिक्षक रविकिरण भास्करराव पाटील यांची केरळ राज्यातील राजागिरी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोची येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टाईम 2017 च्या राष्ट्रीय गणित परिषदेसाठी निवड करण्यात आलेली आहे.सदर गणित परिषद ही 7 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन मॅथस एज्युकेशन या प्रशिक्षणात त्यांचा सक्रीय व उल्लेखनीय सहभाग होता. या प्रशिक्षणाअंतर्गत घेण्यात आलेल्या अंतिम लेखी परीक्षेत राज्यातील 240 शिक्षकांमधून त्यांनी ’अ’ श्रेणीसह राज्यातून 6 वा क्रमांक प्राप्त केला.त्यामुळे त्यांना 2 ऑगष्ट 2017 रोजी आय.आय.टी पवई (मुंबई) येथे झालेल्या पदवीदान समारंभात रविकिरण पाटील यांना ‘मॅथस् मास्टर ट्रेनर’ पदवी बहाल करण्यात आली. त्याच अभियनांतर्गत त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच त्यांची वरील परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच 10 ते 12 नोव्हेंबर 2017 दरम्यान गणित विषय शिक्षक प्रशिक्षणात जिल्हास्तरावर प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी काम केले आहे.

यांनी केले अभिनंदन
रविकिरण पाटील यांच्या निवडीबद्दल माजी आमदार राजीवदादा देशमुख, शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ.हेमांगी पुर्णपात्रे, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर, नगरसेवक रामचंद्र जाधव, मानद सचिव व्हि.डी.जोशी, विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.सत्यजित पुर्णपात्रे, मुख्याध्यापक अविनाश वाबळे, शिक्षक वृंद, आजी-माजी विद्यार्थी, मित्र परिवार, सर्व नातेवाईक यांच्यासह स्वप्नील कोतकर यांनी अभिनंदन केले आहे.