फैजपूर । येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात डीजीएनसीसी व 18 महाराष्ट्र बटालियन यांच्या आदेशान्वये महाविद्यालयाचे एनसीसी युनिट, म्युनिसिल हायस्कूल, आ.गं. हायस्कूल सावदा, धनाजी नाना विद्यालय खिरोदा यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत निलेश नेमाडे व स्वप्निल पवार यांनी कॅशलेस डिजिटल इंडिया या विषयावर एकदिवसीय डिजिटल कार्यशाळा घेतली.
समाज प्रबोधनाचा उचलला विडा
यामध्ये एनसीसीच्या ज्युनिअर डिव्हीजन व सिनिअर डिव्हीजनच्या कॅडेटस्ना रोख विरहित साधनांची सविस्तर सादरीकरण करुन प्रशिक्षित करण्यात आले. राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून सद्यस्थितीतल्या अतिआवश्यक डिजिटल प्रणालीचा समर्पक प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने देशातील सर्वात मोठ्या युवक संघटना असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेने समाज प्रबोधनाचा विडा उचलला आहे.
कॅशलेस प्रणाली घेतली समजून
समादेशन अधिकारी कर्नल दिलीप पांडे यांच्या प्रेरणेने एनसीसी अधिकारी लेफ्ट. राजेंद्र राजपूत, म्युनिसिपल हायस्कुलचे एनसीसी फर्स्ट ऑफिसर, एस.एम. राजपूत, आ.गं. हायस्कूलचे एस.एम. महाजन, व्ही.एल. विचवे यांनी स्वतः कॅशलेस प्रणाली समजून घेत कॅडेटस्ना प्रशिक्षित केले.
यांनी केले मार्गदर्शन
निलेश नेमाडे व स्वप्निल पवार यांनी युपीआईई वॉलेट, आधार इनेबल पेमेंट सिस्टिम, युएसएसडी व कार्ड पीओएस यासंबंधी माहिती दिली. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तसेच निरज शिरनामे, संदिप जावरे, हर्षा हिवरे, रोहिणी, मोनिका चौधरी, राहुल मोरे, सौरभ इंगळे, आसिफ शहा यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन लेफ्ट. राजेंद्र राजपूत यांनी केले.