डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे परभणी येथे दिनांक 6 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पातळीवरील एक्सलरेट 2023 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर परिषदेचे आयोजन शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज परभणी येथे करण्यात येत आहे .महाराष्ट्र, गुजरात ,मध्यप्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटक तसेच संपूर्ण देशातून अनेक शाळा व कॉलेजेस यांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतलेला आहे भुसावल तालुक्यातील समर इन्फिनिटी या समूहा तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील इनोव्हेटिव्ह पाच प्रकल्पांची या राष्ट्रीय परिषदेत प्राथमिक स्तरावर निवड झालेली आहे.
*समर समूह भुसावळ या तर्फे राष्ट्रीय परिषदेत निवड झालेले विद्यार्थी*
1.अमेय पद्माकर पाटील पुणे.
2.अभिषेक मंगेश पाटील एमआयटी इंजीनियरिंग कॉलेज पुणे.
3.समीक्षा नितीन पाटील भुसावळ 4.रिद्धेश नितीन चौधरी के नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ
5.अर्णव नितीन पाटील पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ यांची या राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झालेली आहे .
या परिषदेस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांचे पणतू एपीजेएमजे शेख सलीम व एपीजेएमजे शेख दाऊद स्वतः उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉक्टर दिलीप देशमुख पुणे व युवा वैज्ञानिक श्री अजिंक्य कोट्टावर हे मुख्य अतिथी उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर देशमुख यांनी आपल्या भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या समवेत अनेक मोहिमांमध्ये कार्य केलेले आहे. इतर मान्यवर सुद्धा या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परिषदेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वतःच्या इनोव्हेटिव्ह आयडिया सादर करावयाच्या आहेत. यातून जे प्रकल्प निवडले जातील त्यांना पुढील फेरीसाठी राष्ट्रीय स्तरावर एस आर एम इंजीनियरिंग कॉलेज हैदराबाद इथे प्रकल्प सादरीकरणाची संधी मिळणार आहे. म्हणून प्राथमिक स्तरावर भुसावळच्या समर ग्रुप टीमची झालेली निवड खरोखर स्तुत्य आहे. समर समूहाच्या अंतर्गत सर्व सहभागी विद्यार्थी यांनी रोबोटिक्स व विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग व मॅथेमॅटिक्स या विषया अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प सादर केलेले आहेत. अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग व अनुभव व तज्ञ शास्त्रज्ञ यांच्या सोबतचे चर्चासत्र यातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक अनुसंधानाच्या क्षेत्रात कार्य करून विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्याचा समर समूहाचा प्रयत्न आहे. असे मत श्री नितीन जनार्दन पाटील (समर समूह) यांनी व्यक्त केले. या प्रकल्प अंतर्गत या फाउंडेशनचे राज्य समन्वयक व मार्गदर्शक श्री मिलिंद जी चौधरी व मनीषाताई चौधरी व इतर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.