राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेचे नियोजनाच्या सूचना

0

धुळे । शालेय राज्यस्तरीय कुस्ती व तलवारबाजी आणि शालेय राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेचे यजमान पद धुळ्याला मिळाले आहे. या स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होतील. या स्पर्धांचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने काटेकोरपणे नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, आनंद पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, राज्य व राष्ट्रीय कुस्ती व तलवारबाजी स्पर्धेचे यजमानपद धुळ्यास मिळाले आहे ही कौतुकाची बाब आहे. कुस्ती व फेन्सींग या क्रीडा प्रकाराच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन लवकरच होणार असल्याने या कार्यालयामार्फत या क्रीडा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे वेळापत्रक तयार करुन लवकरच पाठविण्यात येणार आहे.