राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेसाठी भुसावळच्या 23 खेळाडूंची निवड

0

भुसावळ- शहरातील सेंट अलॉयसेस हायस्कूलमधील 14 वर्षे व 10 वर्ष वयोगटाखालील 23 खेळाडूंनी मुंबई येथे राज्यस्तरीय पेसापालो स्पर्धेत यश मिळवले. या खेळाडूंची निवड राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात पियुष शिंदे, आयन खान, हर्ष खुशवा, चैतन्य श्रीनाथ, देवांश कोळी, साहिल तडवी, चिन्मयी पाटील, रिद्धी शर्मा, ट्विंकल पाटील तर दहा वर्षाखालील गटात राहुल पाटील, यश ठोंबरे, नाविण्य चौधरी, देवेश सरोदे, राज प्रताप कुशवा, लेखा कोतवाल, श्रद्धा फड, कालिका कुलकर्णी, काजल परदेशी यांची निवड करण्यात आली. त्यांना राजस्थान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे. या खेळाडूंना पेसापालो जिल्हाध्यक्ष आर.जी.बाविस्कर, संजय गायकवाड, संजय चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर टेलमा, सिस्टर सेल्मा, शिक्षक मेघश्याम शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.