राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट खड्डे दुरुस्तीची उच्चस्तरीय चौकशी होणार

0

आमदार हरीभाऊ जावळे यांची ग्वाही

रावेर : रावेर ते चोरवड दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर तीस लाख रुपये खर्च करून थातूर-मातूर पद्धत्तीने केलेल्या कामानंतर रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाल्याचे सडेतोड वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधीसह अधिकार्‍यांचे लक्ष वेधले होते. वृत्ताची दखल आमदार हरिभाऊ जावळे यांनी गांभीर्याने घेतली असून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची ग्वाही दिली.