जळगाव । राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दीड तास वाहतुकीची कोंडी झाल्याचा प्रकार दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. आकाशवाणी ते अंजिठा चौफुली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील ईच्छादेवी चौकाजवळ एक ढंपर थांबले होते. रस्त्याच्या मधोमध ढंपर उभे राहील्याने दुतर्फा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्यातच भुसावळकडे जाणार्या बस चालकाने रिक्षा चालकाला कट लागल्याने दोघांमध्ये वाद झाला.
आकाशवाणी ते अंजिठा चौफुलीपर्यंत वाहनांच्या रांगा
शाब्दिक वादामूळे आणखी वाहतुक विस्कळीत झाली. पाचोरा रस्त्याने शिरसोली चौकापर्यंत तर महामार्गावर आकाशवाणी चौकापर्यंत, अंजिठा चौफुली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बेशिस्तपणे दुचाकीसह कालीपिली चालक वाहने काढत असल्याने वाहतुकीची कोंडी वाढत गेली. दरम्यान जेवणासाठी एक कंत्राटी वाहतुक कर्मचारी जात होता. त्या कर्मचार्याने एकटाने वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. तब्बल एक तासाने वाहतुक सुरळीत झाली.