जळगाव- आईला भेटून पुन्हा जळगाव घराकडे परतणार्या बांधकाम ठेकेदार विलास बंडू सोनवणे वय 55 मूळ रा. कानसवाडी ता.जि.जळगाव, ह.मु. रामानंदनगर याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास हॉटेल गौरवजवळ घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कानसवाडी येथे विलास बंडू सोनवणे यांची आई राहते. आज सकाळी 6 वाजता आईला भेटण्यासाठी ते दुचाकी क्रमांक (एमएच 19 – 6940) ने दुचाकीने कानसवाडी येथे दुचाकीने गेले. आई व गावातील नातेवाईकांना भेटून कानसवाडी येथून नशिराबाद येथे कामाच्या निमित्ताने गेले. नशिराबाद येथून काम आटोपून जळगावला येत असताना जळगाव शहराजवळ असलेल्या हॉटेल गौरव जवळ समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत विकास सोनवणे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी, भाऊ असा परिवार आहे.