राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेने जळगावातील दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

Biker blown up by speeding truck : Jalgaon Married Woman Killed ; Husband Injured जळगाव : जळगाव येथून भुसावळातील नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विवाहितेचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. शीतल शेषराव दीपके (37, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव, ह.मु.औरंगाबाद) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

कु्रर काळाने घातला घाला
शेषराव भीमराव दीपके हे पत्नी शीतल यांच्यासोबत औरंगाबाद येथे वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात त्यांचे आई विमल व वडील भीमराव दीपके हे राहतात. अधुन-मधून शेषराव व त्यांची पत्नी हे औरंगाबाद येथून घरी जळगावी येतात. शनिवारी दीपके दाम्पत्य जळगावात आल्यानंतर दोघे जण रविवार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता त्यांची भुसावळ येथे राहत असलेली काकू यांना भेटण्यासाठी दुचाकी (एम.एच. 10 बी.डी.5003) ने निघाले असता तरसोद फाट्याजवळ भरधाव येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिल्याने शीतल या दुचाकीवरून खाली पडल्याने ट्रकखाली आल्याने जागीच ठार झाल्या तर शेषराव यांच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली.