राष्ट्रीय महामार्गावर ’बर्निंग रिक्षा’ , वाहनधारकांनी अनुभवला थरार

0
 भुसावळ : जळगाव येथून भुसावळला येत असलेल्या रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना गुरुकुल महावद्यालयाजवळ रविवारी दुरी एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला.
पालिकेच्या अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती कळताच वसंत पाटील, प्रवीण मिठे व डिगंबर येवले यांनी आग विझवली. आगीत मोठ्या प्रमाणावर कपाशी जळाल्याने सुमारे 25 हजारांचे नुकसान झाले. आगीची झळ रीक्षालाही बसली. गाद्या भरण्यासाठी भुसावळात ही रीक्षा येत असल्याचे सांगण्यात आले.