जैसलमेर-१० जानेवारी रोजी राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील एका खेड्यातील महिलेच्या प्रसूतीवेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचे डोके शरीरापासून वेगळे होऊन बाहेर आले होते. बाळाचे डोके बाहेर आले व शरीर गर्भाशयातच राहिले होते. याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी)ने राजस्थान सरकारला नोटीस पाठविली आहे. जोधपुरच्या एका रुग्णालयात हा प्रकार घडला होता. राज्य सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.