भुसावळ : क्रीडा क्षेत्राचे राष्ट्रीय युवा प्रेरणास्त्रोत निलेश मधुकरराव राणे यांची भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड काही राज्यांचे सचिव व पदाधिकार्यांच्या सहमतीने करण्यात आली. निलेश राणे यांनी 9 वर्षांपासून राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा मोठा प्रमाणावर विकास व्हावा त्यासाठी ते प्रयत्न करत आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण खेळाडूंना अचूक मार्गदर्शन करून त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास संधी उपलब्ध करून देणे तसेच त्या खेळाडूंसाठी ग्रामीण भागातच काही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थी मदत केल्याने ही निवड करण्यात आली आहे. राणे यांना आतापर्यंत एक आंतरराष्ट्रीय, 10 राष्ट्रीय, पाच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे तसेच त्यांची तीन राष्ट्रीय रेकॉर्ड बुक मध्ये सुद्धा नोंद करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सौरव साळुंके, योगेश कुमावत, विकास वराडे, किशोर खोपडे, अजित कांबळे तसेच राज्यातील खेळाडूंनी व क्रीडा प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले.