जळगाव । ग्रेटर नोएडा येथे युवादिन 12 जानेवारी रोजी आयोजित युवा प्रतिनिधी आणि कलाकार राष्ट्रीय युवा महोत्सवासामध्ये महाराष्ट्रातील 50 युवक युवतींचा सहभाग असून नुकतीच महाराष्ट्राची टीम या महोत्सवासाठी मुंबई येथून रवाना झाली. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय विनित मालपुरे, महेश नवलेकडे नेतृत्व
विनित मालपुरे, महेश नवले यांच्याकडे नेतृत्व
महाराष्ट्रातील युवा सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कार्थी अशा 50 युवक, युवतींचा समावेश या टीम मध्ये आहे. महेश नवले, विनित मालपुरे हे टीमचे नेतृत्व करीत आहे. यात मुंबई येथून प्रणय जाधव, अमीर काझी, दत्ता भोसले, कोमल यादव, रफत शेख, अश्विनी नायडू, सायली नावले, प्रिया कृष्णमूर्ती यांचा तर पुण्यामधून सौरभ नावंदे, नेहा चांदेकर, सागर रोकडे आदी सहभागी होणार आहे. मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांची प्रमुख उपस्थिती असेल.
विविध राज्यातील संस्कृतीचे महोत्सवात दर्शन
भारतातील सर्व राज्यातून आलेले युवक आपआपल्या राज्यातील, परंपरा आणि संस्कृतीच दर्शन या मोहत्सवात घडवणार आहेत. तसेच या महोत्सवात डिजीटल इंडिया, भ्रष्टाचाराविरूद्ध लढा, युवकांचे राजकारणातील योगदान, स्कील इंडिया- स्मॉल स्केल टू एमएनसी, स्वच्छ भारत अभियान, लिंग समानता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, आतंकवादविरोधी लढा, अपंग व्यक्ती तसेच लहान मुलांची आव्हाने व समस्या यांवर चर्चा करताना टीम महाराष्ट्रातील युवा सामजिक कार्यकर्ते दिसणार आहेत. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय उत्कृष्ट युवक किवा युवती यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र 50 हजार रुपये दिले जातात. संस्थेसाठी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व 2 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असते. 2015-16 या वर्षी च्या विजेत्यांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करणयात येणार आहे. या सर्व टीमला मुंबई चे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समनव्यक यशवंत मानखेडकर व मदन घेगाटे यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. दरम्यान, महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राची टीम नुकतीच मुंबई येथून रवाना झाली. या टीमचे नेतृत्व करणार्या विनित मालपुरे यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युवादिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील या युवक युवतींचा सहभाग लक्षवेधी असणार आहे.