राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

0

मुंबई। बिहारची राजधानी पाटणा येथे 11 ते 13 ऑगस्टदरम्यान खेळल्या जाणार्‍या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरूष आणि महिला संघ जाहिर करण्यात आले नागपूरमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा रग्बी स्पर्धेतून राज्याच्या प्रातिनिधीक संघाची निवड करण्यात आली. पाटणातील पाटलीपत्र स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार्‍या या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, ओदिशा, कर्नाटक, छत्तिसगढ, झारखंड, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदिगढ, मध्य प्रदेश, बिहार, सेनादलाचे संघ सहभागी होतील.

महाराष्ट्राचे संघ : पुरूष : सुनील चव्हाण (कर्णधार, मुंबई शहर), रेहमुद्दीन शेख (मुंबई शहर), मंगेश चौहान (मुंबई शहर), दीपराज राजेभोसले (सातारा), तुषार धुमाळ (सातारा), अक्शय व्हरांबळे (कोल्हापूर), दिलीप पाटील (कोल्हापुर), रोहीत भेंडबुचे (ठाणे), सागर सिंग (मुंबई शहर), विकास राजोडीया (मुंबई उपनगर), सोमनाथ चौहान (मुंबई शहर), भारत चव्हाण (मुंबई शहर), शैलेश देवरूखकर ( मार्गदर्शक, मुंबई शहर), अमर भंडारवार (नागपुर). महिला : विह्बीज भरूचा (पुणे), सुरभी दाते (पुणे), नेहा परदेशी (पुणे), पुजा भाळे (पुणे), निलम पाटील (कोल्हापूर), शितल राणे (मुंबई शहर), शितल ठक्कर ( मुंबई उपनगर), गार्गी वाळेकर (मुंबई उपनगर), सारा खान (मुंबई उपनगर), चंचल राजभर (मुंबई शहर), योगिता खाडे (रत्नागिरी), पायल कनोजिया (मुंबई शहर), विठ्ठल पवार (मार्गदर्शक, मुंबई शहर ), किरण मांजे (व्यवस्थापक, मुंबई शहर).