चाळीसगाव : राष्ट्रीय विधी सेवा दिन महाराष्ट्र शासनाने 9 ते 18 नोव्हेंबर 2017 या दहा दिवसादरम्यान विविध योजनांचा व कार्यक्रमाचा सप्ताह साजरा करण्याच्या निर्देशानुसार चाळीसगाव व विधीसेवा समिती व वकील संघ चाळीसगाव यांच्यावतीने 10 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोबाईल व्हॅनचे उद्घाटन 9 रोजी सकाळी 10 वाजता करुन भोरस बु॥ व करगाव येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करुन दुपारी हा कार्यक्रम लोकन्यायाल मोबाईल व्हॅनवर घेण्यात आले. 10 रोजी सकाळी 10 वाजता मोबाईल व्हॅनसह मोटारसायकलचे आयोजन करण्यात येवून पातोंडा व पंचायत समिती कार्यालयात कायदेविषयक चर्चा सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास न्यायमुर्ती गिरडकर मॅडम, एस.एस.तट, पी.बी.भरपूरे यांच्यासह वकील संघाचे अध्यक्ष डी.एस.पाटील व सदस्य सुभाष पवार, प्रशांत बोदडे, साई महाजन, राहुल माळी, कविता जाधव, संतोष पाटील, नुतन लोढाया, निलेश निकम, संदीप जाधव आदी वकीलांसह गटविकास अधिकारी श्री.पवार, विस्तार अधिकारी बापू बागुल व स्वप्निल पाटील, गौतम निकम, भागवत मोरे यांच्यासह तालुका विधीसेवा समितीचे वरिष्ठ लिपीक जी.आर.पवार आदी मान्यवर उपस्थित होते.