पिंपरी-चिंचवड : अल्फा लावल कंपनीच्या दापोडी येथील कारखान्यासमोर राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेली निदर्शने ही असमर्थनीय आणि बेकायदा आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार या कंत्राटी कामगारांसंबंधीचे काही मुद्दे असतील तर ते संबंधित कंत्राटदार कंपनीकडे राष्ट्रीय श्रमिक आघाडीने मांडावेत, अशी भूमिका अल्फा लावल कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतली आहे.
निदर्शने बेकायदेशीर
कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विविध कंत्राटदारांच्या सेवेत असलेल्या परंतु कंपनीच्या दापोडी कारखान्यामध्ये कामास पाठविण्यात आलेल्या कामगारांचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीने अलीकडेच कंपनीसमोर निदर्शने केली होती. ही निदर्शने बेकायदेशीर आहेत. तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कंपनीला पाठविलेल्या पत्रात केलेले दावे दिशाभूल करणारे आहे. सतत सुधारणा करीत राहण्याच्या तत्वाला अनुसरून अल्फा लावलने कंत्राटी कामगारांसह कंत्राटदार राबवित असलेल्या प्रक्रिया व व्यवस्थांवर देखरेख ठेवण्याच्या आणि त्याचा आढाव घेण्याच्या आपल्या कार्यपद्धतीतही खूप सुधारणा केल्या आहेत. कंत्राटी कामगारांविषयी कंपनीला सहानुभूती आहे. कायद्यातील तरतुदींनुसार या कंत्राटी कामगारांसंबधीचे काही मुद्दे असतील तर ते संबंधित कंत्राटदार कंपनीकडे राष्ट्रीय श्रमिक आघाडाने मांडावेत, अशी भूमिका अल्फा लावल कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतली आहे.