नंदुरबार। राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा सहविचार सभा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ सुळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशा (ता.शहादा) येथील दगाबापू हॉल येथे घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश सुळ यांनी पक्ष वाढीवर भर देवून येत्या नगरपालिका निवडणुकीसाठी आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच यावेळी सभेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पदाधिकार्यांची निवड करणे यावर चर्चा करण्यात आली. तसेच यात महिला आघाडी, युवा आघाडी, आदिवासी आघाडी, विद्यार्थी आघाडी, तालुकाध्यक्ष, सचिव, शहराध्यक्ष व अल्पसंख्यांक आघाडी याची निवड करणे आदी विषयांवार चर्चा करण्यात आली. पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचे राष्ट्रीय कार्य, आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कशाप्रकारे संघटनात्मक शक्ती उभी करावी आदी विषय यावेळी मांडण्यात आले.
तालुकाध्यक्षपदी कापुरे, शहराध्यक्षपदी सूर्यवंशी
याप्रसंगी शहादा तालुकाध्यक्षपदी सोमा धर्मा शिंदे, उपाध्यक्ष अशोक गोविंदा वैदू, सचिवपदी जगन्नाथ जोगा हाके, तर तालुका संघटक म्हणून रघुनाथ प्रताप जाधव, तसेच तळोदा तालुकाध्यक्षपदी प्रकाश भिका कापुरे, तळोदा शहराध्यक्षपदी प्रशांत जगन्नाथ सुर्यवंशी तर नंदुरबार आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी छोटूदादा किसन भिल, तालुका संघटकपदी नामदेव संतोष गोयकर, तालुका उपाध्यक्षपदी काशिनाथ दगा श्रीराम, विभागीय उपतालुकाध्यक्षपदी माखा सोमा मदने यांची निवड करण्यात आली. यावेळी पप्पू धनगर, बारकु शिरोळे, अर्जुनदादा मानवर, माखा नारायण कोळेकर, सावळीराम करीया, अनिल बोरसे, चंदू पाडवी, दिनेश शिरसाठ, दीपक मोरे, प्रशांत सुर्यवंशी, उमेश मदने आदी उपस्थित होते.