राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळात नवीन सभासद नोंदणीची अफवा

0

चाळीसगाव (अर्जून परदेशी)। तालुका व तालुका बाहेर वरिष्ठ महाविद्यालयासह छत्तीस शाखांचा विस्तार असलेली जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये क्रमांक दोन असलेली राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये नवीन सभासद केले जात असल्याची मोठी चर्चा तालुक्यात रंगली असून मात्र ही अफवा असल्याचे सत्ताधार्‍यांचे म्हणणे असले तरी विरोधी सदस्यांनी अशी काही गुफ्तगुबाबत सावध भूमिका घेतली आहे. एकंदरीत या चर्चेने ही संस्था पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या तीन वर्ष्यापूर्वी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती यात कृषिभूषण अरुण निकम, डॉ.एम बी पाटील, डॉ.संजय देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलच्या हाती यांच्या संस्थेची धुरा आली होती. तर संस्थापक चेअरमन य.ना.चव्हाण यांचे चिरंजीव धनंजय चव्हाण यांचे यशवंत पॅनलला विरोधी सदस्यांची भूमिका वठविण्याची संधी सभासदांनी दिली होती.

तालुक्यात जोरदार चर्चा
या संस्थेच्या सभासद होण्यासाठी नेहमी स्पर्धा राहिली आहे संस्थेच्या सभासद नोंदणीची गुप्त प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा तालुक्यातील सर्वत्र दिसून येत आहे. 1987 पासून नवीन सभासदांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही आज पावेतो सभासद होता आलेले नाही. परिणामी प्रत्येक निवडणूक येण्या अगोदरच्या डॉ.वर्षांपूर्वी अशी कुजबुज चर्चिली जाते. मात्र यावेळी काही गुप्त हालचाली सुरू असल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर सभासदासह अनेक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत इच्छुकांकडून खुलेआम होताना दिसते आहे.

विरोधकांकडून सावध पवित्रा
नवीन सभासदांची नोंदणीबाबत सत्ताधार्‍यांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. हे आम्हाला कल्पना असून राबाबत सभेतून आम्हाला सूचना मिळालेली नाही. मात्र अशा नवीन सभासद भरतीच्या प्रयत्नाने संस्थेचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यामूळ हेतूला तडा जाईल, अशी भीती विरोधी संचालकांचे वतीने यशवंत गटाचे प्रमुख धनंजय चव्हाण यांनी व्यक्त केली.

सत्ताधार्‍याकडून इन्कार
संस्थेच्या सभासदमध्ये नवीन सभासदांची वाढ करणार असल्याची विचारणा सत्ताधार्‍याकडे होत आहे. ही नेमकी अफवा आहे की खरच नवीनं सभासद केले जाणार आहे , यांची विचारण्यासाठी संस्थेचे सचिव अरुण निकम यांच्याशी संपर्क साधला असता संस्थेच्या मागील कुठल्याही प्रकारचा विषयाची चर्चा अथवा ठराव किंवा कार्यालयीन प्रक्रिया देखील केलेली नाही. त्यामुळे असे गुप्त पद्धतीने नवीन सभासद केले जात असल्याबाबतची अफवा असल्याची मत श्री. निकम यांनी सांगितले.

का होते आहे चर्चा?
या संस्थेची स्थापना 31 डिसेंबर 1956 साली झाली आजमितीस 25 हजार विदयार्थी तर 600 शिक्षक विद्यादानाचे काम करीत आहेत. 75 शिक्षकेतर कर्मचारी कारभार पाहत असून संस्थेच्या संचालक मंडळावर 19 संचालक व 4 स्वीकृत सदस्य संचालक आहेत. पुढील निवडणूक होण्याच्या अगोदर 2 वर्षे नवीन सभासद वाढविले तर अशा सभासदांना येत्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळत असते. या नियमामूळे नवीन सभासद 15 मार्च पूर्वी केले तर त्यांना मतदान करता येणार आहे यामुळेच अश्या सभासद वाढीची अफवा पसरविली जाते आहे. असा सत्ताधार्‍यांचे म्हणणे असून विरोधकांचा या बाबतीत सावध पवित्रा दिसत आहे. मात्र तुर्तास सभासद वाढीची चर्चा तालुक्यात रंगली आहे.