जळगाव । सॉफ्ट बॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने स्व. नवदिपसिंह नंदा यांचे स्मृती प्रित्यर्थ आयोजीत राष्ट्रीय आमंत्रितांच्या पुरुष गटाच्या सॉफ्ट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे तृतिय स्थान प्राप्त केले.
तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात महाराष्ट्र पुरुष संघाने विजय प्राप्त करुन ब्रांझ मेडल प्राप्त केले, संघात हर्षल मोरे, सुमेध तळवेळकर, कल्पेश कोल्हे, प्रितीक्षा पाटील, गौरव चौधरी, निखील कडू, अभिजीत शेलेकर, अक्षय कुडवे, आशिष जोगळेकर, अक्षय मोरे यांच्या समावेश होता. संघाने मिळविलेल्या यशाबद्दल अध्यक्ष ना. गिरीष महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, डॉ.प्रदीप तळवेळकर, प्रशांत जगताप डॉ.सुरज येवतीकर, एन.डी.परवाले, नितीन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.