पिंपरी : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या 190 जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समसरसता गतविधी व सामाजिक समरसता मंडळ यांच्या वतीने पिंपरी चौकातील पुर्णाकृती पुतळ्यास जिल्हा संघचालक डॉ. गिरीश आफळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, गीता मोहिते, समरसतेचे पंजाबराव मोंढे आदी उपस्थित होते. योळी गीता मोहिते म्हणाल्या की, महात्मा फुले यांच्या प्रयत्नामुळेच समाजात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडले. समाजाचा विरोध पत्करून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण व्यवस्था सुरू केली. त्यांच्यामुळेच आज माझ्यासारख्या महिल्या समाजात उभ्या राहिल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन पंजाबराव भोंडे यांनी केले. तर, संतोष गुरव यांनी आभार मानले.