भुसावळ । राज्यभरात अनेक मद्य आणि मांसविक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुषांची नावे दिलेली आढळतात. धर्मशास्त्रानुसार मद्यपान आणि मांसाहार निशिध्द मानले जाते. त्यामुळे या बाबी धार्मिक भावना दुखावणार्या असून शासनाने अशा व्यापार्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात राष्ट्रीय हिंदू आंदोलन संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली.
तसेच संसदेमध्ये लोकप्रतिनिधी जनहिताचे प्रश्न मांंडण्यापेक्षा संसदेचे कामकाज अधिक वेळ कसे बंद पडेल यातच मग्न असतात. यामुळे देशहिताचे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. पर्यायाने देशाचे नुकसान होते.
करिअरकडे लक्ष देण्याची आवश्यकता
याप्रसंगी सलिम पटेल यांनी सांगितले की, समाजाचे काम करणे ही मोठी जबाबदारी असते. त्यात समतोल साधून काम करावे लागते. समाजहिताचे काम करायचे असल्यास संघटीत होणे आवश्यक आहे. समाजबांधव विविध क्षेत्रात राजकारण, शिक्षण, धार्मिक, व्यवसाय, पत्रकारिता अशा क्षेत्रात अग्रेसर दिसून येतात. ही बाब अभिमानास्पद असून शिक्षण घेत असलेल्या युवा पिढीने रिकाम्या भानगडीत न पडता आपल्या करिअरकडे लक्ष देेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुब्बशिर पटेल या मुलाने नाते शरिफ पठणाने केली. याप्रसंगी साकेगाव उपसरपंच शकिल पटेल, नाचणखेडा उपसरपंच रज्जाक पटेल, ग्रामपंचायत सदस्य सद्दाम पटेल, सादिक पटेल, दस्तगिर पटेल, साबिर पटेल, बबलू पटेल, मौैलाना रफिक पटेल, वाहिद पटेल, मौलाना मुक्तार पटेल, जावेद रब्बानी, देशमुख आदी समाजबांधव उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
सुत्रसंचालन एजाज अहमद यांनी केले. प्रस्तावना युसुफ देशपांडे यांनी तर आभार वाहिद देशपांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.