शिरगाव येथील साईबाबा मंदिरास सपत्नीक भेट
शिरगाव : राष्ट्राची उभारणी व प्रगती साधण्यासाठी सर्व समाज एकत्र जोडण्याची व तो एकत्र होण्याची गरज असते.ही किमया बोलून सांगून साधता येत नाही. मानसे एकत्र करण्यासाठी धार्मीक स्थळांची गरज असते. बाबांच्या आर्शिवादाने समाजातील मतभेद दूर होतात व चांगल्या कामाची उभारणी होते राष्ट्र उभारणीसाठी हे्च महत्वाचे आहे.असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
येथील साईमंदिराला देशमुख यांनी नुकतीच सपत्नीक भेट दिली. मंदिराची पाहणी केल्यानंतर साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त माजी आमदार प्रकाश देवळे व विश्वस्त सपना लालचंदाणी यांनी देशमुख दांपत्यांना साईबाबांची मूर्ती देवून विशेष स्वागत केले.
तरूणांनी बांबांच्या शिवकवणूकीचे आचरण करावे
यावेळी देशमुख म्हणाले, शिरगाव येथे खुद्द बाबांचा वावर आहे. त्यामुळे आवघ्या वर्षात हे मंदिर जगभर प्रसिद्ध झाले आहे. देवळे यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. शिरगाव येथील साईमंदिर उभारणीचे काम हे साईबाबंच्या कृपेने झाले असून भविष्यात शिरगाव येथील साई मंदिर हे भाविकांचे श्राद्धास्थान ठरणार आहे. तरुणांनीही बाबांच्या शिकवणूकीप्रमाणे अचरण केल्यास यशाचा मार्ग नक्कीच दिसतो. साईमंदिराची उभारणीही त्यांच्या आज्ञेमुळेच प्रकाश देवळे यांनी केली असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अन्नछत्राचे व्यवस्थापक जयेश मुळे, अनिल देवकर,सिधाजी माने,गणेश कपिले,अर्जुन दहिभाते,विष्णू कदम,विजय लोखंडे,मच्छिंद्र कापरे,आदी मान्यवर उपस्थित होते.