महामंडलेश्वर जनार्दन महाराज : वढोदा येथे कर्तृत्ववान मातांचा सत्कार
भुसावळ : 24 : मातृशक्ति ही सर्वांत मोठी शक्ती आहे. तिचा सन्मान करणे ही सर्वांत मोठी भक्ती आहे. आपले सर्व दु:ख विसरून मुलांचे दु:ख आपले मानणारी ही एक आईच असते. मुलांना समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी आयुष्य समर्पित करणार्या आजच्या सत्कारार्थी माता खरोखरच महान आहेत, असे विचार महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरी महाराज यांनी व्यक्त केले. पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त मधुर संस्कार केंद्र यावल व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे संयुक्त विद्यमाने वढोदा प्र.सावदा (ता.यावल) येथील निष्कलंक धाम येथे पार पडलेल्या मातृवंदना कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शास्त्री भक्तिकिशोरदास, पंचरत्न कृषी पर्यटन केंद्राच्या जाईबाई हटकर, डॉ. सिंधू भंगाळे, सेवामूर्ती साहर्ली बारेला, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, मधुर संस्कार केंद्राचे प्रा.पी.आर. पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार हरिभाऊ जावळे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. सामाजिक, राजकारण, शिक्षण, उद्योग, शेती, दारूबंदी आदी क्षेत्रात स्वत: अतिशय उल्लेखनीय कार्य करून आपल्या मुलांनाही समाज सेवेसाठी प्रवृत्त करणार्या 14 कर्तृत्वमान मातांचा सत्कार यावेळी महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरी महाराज आदी मान्यवरांचे हस्ते स्मृती चिन्ह, शाल, पुस्तके, भेट देवून सत्कार करण्यात आला.
या कर्तृत्ववान मातांचा सत्कार
श्रीमती प्रभाताई खुशाल पाटील (खिरोदा), जयतुनबी बापूमिया पटेल (पळशी, मलकापूर), वत्सलाबाई विष्णू चौधरी (जळगाव), सखूबाई बाबूलाल तडवी (पाचोरा), सुमन अनिल महाजन (एरंडोल), शांताबाई कमलाकर वाणी (यावल), सिंधू योगराज चौधरी (भालोद), विमल प्रकाश पवार (फैजपूर), आशा चंद्रगुप्त भालेराव (ऐनपूर), अलका पुंडलिक सूर्यवंशी (बामणोद), राखी जगदीश पाटील (खडके, एरंडोल), भारती विलास पाटील (चुंचाळे, जळगाव), जलवंती प्रशांत महाजन (भालोद), प्रियंका भगवान पांडे (जळगाव).