रासायनीकरित्या आंबे पिकवणार्‍यांवर कारवाई करा

0

नवापूर । कारपेट व कार्बाईडने पिकवलेले आंबे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस – ए – इत्तेहाद उल मुस्लीमीन (एम आय एम)पार्टी यूनिट नवापूर कडून करण्यात आली आहे. याबाबत तहसिलदार व पोलिस निरिक्षक, मुख्याधिकारी नवापूर तसेच उपआयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

असा आहे निवेदनाचा आशय
नवापूर शहरात कारपेट व कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची विक्री जोरात सुरु असुन असे करणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घेऊन अशा व्यापार्‍यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा 10 मे रोजी तहसिल कार्यालयासमोर कारपेट व कार्बाईडने पिकविलेल्या आंबे फेको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा एमआयएमतर्फे देण्यात आला आहे. निवेदनाव्दारे इशारा देतांना रऊफशेख -एमआयएमचे नंदुरबार जिल्हाउपाध्यक्ष रऊफ शेख तसेच तौसिफ आमलीवाला,सोहेब शेख,जूनेद आरिफ पठाण,आदिल काझी,इरफान काझी,इमरान पटवा, इनायत पटवा,शाहरूख सैय्यद,अरजान सैय्यद,सोहेब मुन्शी,सिकंदर पटवा सर्व एम आयएम कार्यकर्ता यांनी दिला आहे.