जळगाव । राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय एकात्मता शिबीर म्हैसूर विद्यापीठ म्हैसूर अंतर्गत, शासकीय फस्ट ग्रेड कॉलेज, सिध्दार्थ नगर म्हैसुर (कर्नाटक) येथे नुकतेच आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात 5 राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघाने प्रश्न मंजुषा स्पर्धेत भाग घेत पाच विद्याथ्यांनी पारितोषिक प्राप्त केले.
या स्वयंसेवकांना मिळाले पारितोषिक
हर्षदा पाटील व संदीप पाडवी (प्रथम), दिपक पाटील व पुजा नकावे (व्दितीय), अक्षय चौधरी (तृतीय ) तर उत्कुष्ट लावणी सादरीकरणात स्वाती पाटील, प्रियंका पाटोळे, सिमा वाघ, हर्षदा पाटील, पुजा नकवे यांना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. या शिबीरात विद्यापीठातर्फे विशाल गुरचळ, संदिप पाडवी, स्वाती पाटील, प्रियंका पाटोळे, सिमा वाघ सामाजिकशास्त्र प्रशाळा, एकक (समाजकार्य विभाग) उमवि, जळगाव, संदिप चौधरी, दिपक पाटील, अक्षय चौधरी, हर्षदा पाटील व पुजा नकवे, उमवि पदवी व पद्व्युत्तर एकक यांचा सहभाग होता. तर संघव्यवस्थापक म्हणून डॉ. राजु गवरे, एच.जे. थीम कला, व विज्ञान महाविद्यालय, मेहरुण-जळगाव हे होते. त्यांच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील व विद्यार्थी विकास व रासेयो विभागाचे प्र. संचालक प्रा.एस.टी.इंगळे तसेच व्य.प.सदस्य दिलीप पाटील यांनी अभिनंदन केले.