अक्कलकुवा:आर.एफ.एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा, रा.से.यो. एककातर्फे ब्रिटिश अंकुशविहीर येथे मोफत हॅन्ड सॅनीटायझर, फेस मास्कचे वितरण करण्यात आले. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावामुळे बाजारात हॅन्ड सॅनीटायझरची कमतरता आहे. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील काही व्यक्ती याबाबत जागृत नसल्याकारणाने रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय पाटील (रसायनशास्त्र विभाग प्रमुख) यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे रसायनशास्त्र विभागात हॅन्ड सॅनीटायझर बनवले व 400 बॉटल्स ( 40 लिटर) हँड सॅनीटायझर व महाविद्यालयातील रा. से. यो. स्वयंसेवक यांनी घरी बनवलेले 350 मास्क ब्रिटिश अंकुश विहीर गावात वितरित केले. तसेच 5 लिटर हँड सॅनीटायझर प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रिटिश अंकुश विहीर येथे वितरित केले. गावात सॅनीटायझर तसेच मास्क वापरण्यासंबंधी जनजागृती करण्यात आली. यादरम्यान सोशियल डिस्टन्सींगची मर्यादा राखण्यात आली. यावेळी ब्रिटिश अंकुशविहीर गावातील सरपंच अरुणाताई नाईक, उपसरपंच गणेश दादा, ग्रा. पं. सदस्य संपत वसावे, नंदुरबार रासेयो विभागीय समन्वयक प्रा. डॉ. बी. एस. पाटील, प्रा. डॉ. विजय पाटील (कार्यक्रम अधिकारी), प्रा. देवरे सर(खापर महाविद्यालय) प्रा. गोपाल शेंडे, प्रा. गोटू सुर्यवंशी, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, रजनीकांत दादा नाईक, राजेंद्र वसावे (सेंद्रीय शेती ट्रेनर, गॅलवे फाऊंडेशन) गावातील जेष्ठ नागरिक, रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
सेंद्रीय शेती ट्रेनर राजेंद्र वसावे यांनी सेंद्रीय शेती व आपले आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, रा.से.यो. स्वयंसेवकांच्या मदतीने अभियान पूर्ण करण्यात आले.