जळगाव – घरातील सर्व मंडळी शेतावर कामावर गेलेले असतांना एका 30 वर्षीय तरूणाने घरात कोणीही नसतांना घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली असून याबाबत पाळधी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद सुरेश माईसकर (धोबी) वय-30 रा. भजे गल्ली, पाळधी ता. धरणगाव यांनी राहत्या घरात दुपारी 2.30 वाजेपुर्वी आतून दरवाजा बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान पत्नी दुपारी 2.30 वाजता शेतातून काम करून घरी आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात सायंकाळी 6 वाजता मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत पाळधी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.