चेन्नई : भारतीय संघाचा ओपर लोकेश राहुल तिसरा दिवस त्याच्या नावावर राहिला.अवघ्या एका धावेने लोकेशचे व्दिशतक राहिले. पार्थिव पटेल याच्या सोबत केलेल्या ओपनिंग दमदार केली.सावध खेळीने केलेल्या खेळीने व दोन महत्वपुर्ण भागीदारीच्या जोरावर तिसर्या दिवसा अखेर भारताने 4 बाद 391 धावा केल्या. यात पार्थिव पटेल याने 71 धावावर बाद झाला. लोकेश राहुलने इंग्लंडच्या गोलदांजांना जेसिर आणले.खेळ संपला तेव्हा करूण नायर 71 धावावर तर मुरली विजय 17 धावांवर खेळत आहे. चेतेश्वर पुजार हा संघासाठी 16 धावा जोडू शकला तर आज कर्णधार विराट कोहली आपल्या बॅटने भारतीय संघासाठी 15 धावा काढून त्याला लवकरच तंबूत परत जावे लागले.पाचव्या कसोटीचा तिसरा दिवस टीम इंडियाच्या या यशस्वी पाठलागाचा नायक अर्थातच सलामीचा लोकेश राहुल ठरला. पण पार्थिव पटेल आणि करुण नायर या सहनायकांनी राहुलला दिलेली साथही भारताच्या कामगिरीत मोलाची ठरली.
पाचव्या कसोटीत भारतीय संघाने चेन्नईमध्ये इंग्लंडला जशास तसं उत्तर दिलं आहे. या कसोटीत इंग्लंडच्या 477 धावांचा पाठलाग करताना भारताने तिसर्या दिवसअखेर 4 बाद 391 अशी दमदार मजल मारली आहे.तिसरा दिवस गाजवला तो लोकेश राहुलने. चौफेर फटकेबाजी करणार्या राहुलनेे तिसर्या दिवशी आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या गोलदांजीला झोडपून काढले. सलामीला लोकेश बरोबर आलेल्या पार्थिव पटेलनेही 112 चेंडूंत सात चौकारांसह 71 धावांची खेळी उभारुन आपल्याला मिळालेल्या संधीचं पुन्हा सोनं करून दाखविले. राहुलने ,पार्थिव पटेलच्या साथीने 152 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया घातला.पार्थिवला मोईन अलीने तंबूत परत पाठिवले.उपाहाराला 1 बाद 173 अशी मजल भारताने मारली होती. मात्र उपाहारानंतर भारतीय संघाचा चेतेश्वर पुजारा अवघ्या 16 धावावर बेन स्टोक्स याने आऊट केले तर कर्णधार विराट कोहली 15 असतांना स्टूअर्ट ब्रॅड याने बाद केले.हा सर्वात मोठा धक्का भारताला बसला.स्वस्तात भारताने दोन गडी गमावले.भारताची धावसंख्या 211 वर असतांना 3 गडीबाद झाले होते.यानंतर आलेल्या करुण नायरच्या साथीने लोकेशने 161 धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत पोहोचवले. राहुलने करुण नायरला साथीस घेत चहापानापर्यंत भारताला 3 बाद 256 अशी मजल मारून दिली होती. मात्र सामन्याच्या शेवटच्या सत्रात जबरदस्त फटकेबाजी करत द्विशतकाकडे कूच करणार्या राहुलचे द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले. एक बाजू लावून धरणार्या राहुलने आपले शतक साजरे केले. राहुलचे हे कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक आहे.तिसर्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी करुण नायर 71 धावांवर, तर मुरली विजय 17 धावांवर खेळत होता. इंग्लंडकडे अजूनही 86 धावांची आघाडी आहे.
राहुलंने सावट दूर केले.
राहुलचं पहिलंवहिलं द्विशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. त्याने 311 चेंडूंमध्ये 199 धावांची खेळी 16 चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. करुण नायरच्या 136 चेंडूंमधल्या नाबाद 71 धावांच्या खेळीला सहा चौकारांचा साज होता. पण चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे अनुभवी फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने भारतीय ड्रेसिंगरुममध्ये चिंतेचं वातावरण होतं.राहुलने नायरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी रचून भारतीय चेहर्यांवरचं चिंतेचं सावट दूर केलं.