राहुलच्या लग्नावर दुसऱ्या पत्नीने दिली प्रतिक्रिया

0

मुंबई : नेते प्रमोद महाजनचे सुपुत्र राहूल महाजनने तिसरा विवाह केला आणि पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कझाकिस्तानची मॉडेल असलेली नत्याला इलानीसोबत २० नोब्हेंबरला लग्नगाठ बांधली. आता त्याची पूर्वाश्रमीची पत्नी डिम्पी गांगुलीने यावर तिचे मौन तोडले.

डिम्पी ही सध्या फ्रान्समध्ये आहे. तिथे ती तिची मुलगी आणि पतीबरोबर आनंदात जीवन व्यतीत करत आहे. जेव्हा तिला राहुलच्या तिसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा ती यावर हसली. त्यानंतर म्हणाली, की ‘मला या गोष्टीचा आनंद आहे. त्याला आता तरी खरोखर सुख मिळेल. त्यांना लग्नाच्या खूप शुभेच्छा’.

‘डिम्पी’ने राहुलवर मारझोडीचे आरोप लावले होते. माध्यमांना तिने तिच्या जखमाही दाखवल्या होत्या. त्यानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने व्यायसायिक रोहित रॉयसोबत लग्नगाठ बांधली. आता तिला अडिच वर्षांची मुलगी आहे.