पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली. दरम्यान राहुल कलाटे विरोधातील तक्रार मागे घ्यावी ह्या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाला निवेदन दिले. राहुल कलाटे आणि विनोद मोरे यांच्या विरोधात अनिल महादेव राऊत (वय 52, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलाटे यांनी फोनवरून राऊत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महापालिका भवनातील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात राऊत यांच्यावर कलाटे यांनी खुर्ची फेकून मारली. तसेच राऊत यांची गचंडी पकडून सरकारी कामात अडथळा आणला.