राहुल गांधींकडून गटनेतेपद स्वीकारण्यास इन्कार: अधीर चौधरी कॉंग्रेसचे नवीन गटनेते

0

नवी दिल्ली: लोकसभेतील मानहानीकारक पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याची तयारी केली आहे. पक्षाला नवीन अध्यक्षांची शोध घेण्याचे देखील त्यांनी सुचविले आहे. दरम्यान आता त्यांनी लोकसभेतील गटनेतेपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षाने ५ वेळा खासदार झालेल्या अधीर रंजन चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. काँग्रेसच्या संसदेशी संबंधित रणनीती करणाऱ्या समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदम्बरम, अहमद पटेल, जयराम रमेश यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत अधीर रंजन चौधरी आणि केरळमधील खासदार के. सुरेशही बैठकीत सहभागी झाले होते.