राहुल गांधींचा ‘तो’ इशारा खरा ठरला; आरबीआयनेही केला शिक्कामोर्तब

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारला लक्ष करताना दिसत आहेत. अर्थव्यवस्था, बेरोजगारी या मुद्द्यावरून राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या रिपोर्टचा हवाला देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागच्या अनेक महिन्यापासून मी जे बोलत होतो, त्यावर आरबीआयने आता शिक्कामोर्तब केले आहे” अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राहुल यांनी काही पर्ययाही सुचवले आहेत. ‘माडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन गरीबांचे भले होणार नाही’ असे राहुल यांनी म्हटले आहे.

सरकारने आता कर्ज देण्याची नव्हे तर खर्च करण्याची आवश्यकता आहे. गरीबांना पैसा द्या. उद्योजकांना कर कपात देऊ नका. खर्च वाढला तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. माडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन गरीबांचे भले होणार नाही ” असे राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

करोना विषाणूजन्य साथीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था बाहेर येईपर्यंत आणि तिला करोनापूर्व गती येईपर्यंत सरकारलाच खर्च वाढवून मागणीला चालना द्यावी लागेल, असे आग्रही मत रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या २०१९-२० सालच्या वार्षिक अहवालातून व्यक्त केले.