नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस सत्तेत आल्यास वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात येईल अशी घोषण राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे.
याआधी राहुल गांधी यांनी महिलांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषण केली आहे. ‘सध्या देशात विविध खात्यातील २२ लाख पदे रिक्त आहेत. आमची सत्ता आल्यास ३१ मार्च २०२० पर्यंत ही पदे भरण्यात येईल असे राहुल गांधींनी सांगितले आहे.