नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला जोरदार फटकारले. कॉंग्रेसच्या विचारावर हे सरकार चालले असते तर देशात कधीही बदल झाले नसते या शब्दात मोदींनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मूळ मुद्द्यांवरून लक्ष वेधण्यासाठी विषयांतर करत असल्याचे आरोप केले. देशाची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना बेरोजगारी वाढलेली असताना मोदी मूळ विषयावरू दुर्लक्ष करत असून सहा महिन्यानंतर मोदी घराबाहेर निघणार नाही, देशातील युवक त्यांना मारतील असे वक्तव्य केले होते. यावर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत हरकत घेत गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज काही काळ थांबवावे लागले.