राहुल गांधींना दहशतवादी संघटनांबद्दल सहानुभूती; भाजपचे आरोप !

0

नवी दिल्ली : आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एकवर्ष पूर्ण झाले आहे. या घटनेने संपूर्ण देशात दु:ख पसरले होते. आज या घटनेला वर्षपूर्ण होत असल्याने वर्षभरापूर्वीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. आज शहिदांना श्रद्धांजली अर्पण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व राजकीय पक्षाचे नेते शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करताना सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. पुलवामा हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला? पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळले? सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आले? असे तिखट प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपने पलटवार केला आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी, ‘गांधी कुटुंबियांना फायद्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही’ असे म्हणत टीका केली आहे तर जी व्ही एल नरसिम्हा यांनी राहुल गांधींना लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांशी सहानुभूती असल्याचे आरोप केले आहे.